३० सप्टेंबर या जागतिक पॉडकास्ट दिनानिमित्त या नव्या दुनियेचा फेरफटका…
पॉडकास्ट निर्मिती-व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत मुंबईतील आयडियाब्रू स्टुडियोजचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य कुबेर म्हणतात, “पॉडकास्टिंगमध्ये मराठी टक्का निश्चित वाढतोय. आमच्या प्लॅटफॉर्मचा विचार करता अगदी सहा-आठ महिन्यांपूर्वी एकूण श्रोत्यांपैकी मराठी श्रोत्यांचं प्रमाण हे पाच ते दहा टक्के असायचं, ते आज २० टक्क्यांपर्यंत वाढलंय. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या माध्यम समूहांबरोबरच वैयक्तिक मराठी पॉडकास्टर्सचं प्रमाणही आता वाढतंय. आमच्याकडे आज ५० च्या आसपास मराठी पॉडकास्ट्स आहेत. श्रोत्यांची सध्या सर्वाधिक पसंती ही बातम्यांच्या आणि कथांच्या पॉडकास्टना आहे.”
Comments